तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :– जिल्हा परिषद पालघर येथे आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहपूर्वक साजरी करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे आणि प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांनी नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली. विज्ञान-तंत्रज्ञान, औद्योगिक विकास, शिक्षण आणि लोकशाही मूल्ये यावर त्यांनी विशेष भर दिला. मुलांवरील प्रचंड प्रेमामुळेच त्यांना चाचा नेहरू अशी ओळख मिळाली आणि त्यांचा वाढदिवस ‘बालदिन’ म्हणून देशभर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविधतेत एकता आणि प्रगत भारताचे स्वप्न पुढे घेऊन जाणाऱ्या नेहरूंच्या विचारांची आजही प्रेरणा देणारी परंपरा कायम आहे.अशा थोर व्यक्तीची जयंती आज जिल्हा परिषद पालघर येथे साजरी करण्यात आली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) इजाज अहमद शरीक मसलत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पं)अशोक पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Tags
जिल्हा पालघर