बोईसर (प्रतिनिधी) :– विकास सिंह :– महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ची तारापूर औद्योगिक क्षेत्र व परिसरातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज दुपारी अचानक फुटल्याने औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 1200 उद्योग व परिसरातील 15 ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा ठप्प होणार असून फुटलेल्या जलवाहिनीचे काम तारापूर येथील देखभाल व दुरुस्ती उपविभागाकडून सुरू करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता एमआयडीसीच्या
अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे
एमआयडीसीचे जलशुद्धीकरण केंद्र
ते तारापूर औद्योगिक क्षेत्र अशी ही 1000 एमएमच्या मुख्य जलवाहिनी द्वारे प्रतिदिन सुमारे 70 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येत असून आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बोईसर पूर्वेकडील वारांगडे येथील विराज कंपनीच्या जवळ
सदर जलवाहिनी फुटली असून ही जलवाहिनी 10 ते 12 फूट खोल आहे फुटलेल्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले असून दुरुस्ती दरम्यान पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे तारापूर एमआयडीसीतील उद्योग आणि परिसरातील ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्यावर सात ते आठ तास परिणाम होण्याची शक्यता आहे
Tags
जिल्हा पालघर