पुणे :-(प्रतिनिधी):- साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) आणि रमाई आंबेडकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार सोहळा 2025 यामध्ये यंदाचा “राष्ट्रीय भारत भूषण उत्कृष्ट सिने अभिनेत्री पुरस्कार” प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे.
दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या पुरस्कार निवड पत्रानुसार, मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय, प्रभावी आणि अष्टपैलू अभिनय योगदानाची दखल घेऊन त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दर्जेदार भूमिका, लोकप्रिय चित्रपट तसेच विविध विशेष अॅटम साँगमधील प्रभावी कामगिरी यासाठी त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
हा भव्य सोहळा दिनांक 16 नोव्हेंबर 2025, रविवार, पुण्यामधील भारत इतिहास संशोधन मंडळ येथे पार पडणार आहे. या सोहळ्यास राज्यातील मान्यवर मंत्री, लोकप्रतिनिधी, अभिनेते, अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय अतिथींच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे यांनी सांगितले की, “मृणाल कुलकर्णी यांचे कार्य नवनिर्मितीचा आणि प्रामाणिक कष्टाचा आदर्श आहे. त्यांच्या कार्यामुळे असंख्य युवकांना प्रेरणा मिळते. त्यांच्या प्रभावी योगदानाचा आम्हाला अभिमान आहे.”
Tags
पुणे जिल्हा