नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकांच्या अनुषंगाने २ डिसेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, पालघर व वाडा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर*

पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– पालघर दि. २८ : राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचयातीच्या निवडणूकांच्या अनुषंगाने मंगळवार दिनांक २ डिसेंबर, २०२५ रोजी राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, पालघर व वाडा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात मतदान होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/ अधिकारी / कर्मचारी यांना, मग ते कामानिमीत्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकाच्या दिवशी मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, पालघर व वाडा या स्थानिक स्वराज्य संस्थेतील क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

याच संदर्भात कामगार उप आयुक्त, पालघर कार्यालयात दि.२  डिसेंबर रोजी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असुन संबंधितांनी ०२५२५-२९७१०२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे  आवाहन करण्यात आले आहे.

-: कार्यालयाचा पत्ता :-
कामगार उप आयुक्त, पालघर यांचे कार्यालय, कक्ष क्र. २११, प्रशासकीय कार्यालय-अ, जिल्हा मुख्यालय, पालघर-बोईसर रोड, कोळगांव, पालघर (प), ता. जि. पालघर-४०१४०४

Post a Comment

Previous Post Next Post