पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– पालघर, दि. २८ नोव्हेंबर : अनुसूचित जमातीतील युवकांसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची निवड प्रक्रिया पळसुंडे (ता. मोखाडा) येथे ८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या मार्फत सन २०२५-२६ या वर्षासाठी तिसऱ्या सत्राचे प्रशिक्षण दिले जाणार असून हे प्रशिक्षण शासन निर्णय क्रमांक टीएसपी १९८९, १९९० व २०१० अन्वये राबविण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्ष भोजन व्यवस्था सुरू झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना पुढील माहिती कळविण्यात येईल. प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या युवकांनी दि. ०८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता शारीरिक पात्रता चाचणीसाठी पळसुंडे केंद्रावर हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवड प्रक्रियेचे वेळापत्रक
शारीरिक पात्रता चाचणी : ०८ डिसेंबर २०२५
लेखी परीक्षा (पात्र उमेदवारांसाठी) : ०९ डिसेंबर २०२५
अंतिम निवड यादी : १० डिसेंबर २०२५
शारीरिक निकष
उंची : किमान 165 से.मी.
वजन : किमान 50 कि.ग्रॅ.
छाती : 79 ते 84 से.मी. (फुगवून)
वय : 18 ते 26 वर्षे
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण
प्रवर्ग : अनुसूचित जमात (ST)
सोबत आणावयाची मूळ कागदपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला
12 वीचे गुणपत्रक
जातीचा दाखला
डोमिसाईल प्रमाणपत्र
आधारकार्ड प्रत
नाव नोंदणी प्रमाणपत्र
निवड प्रक्रियेसाठी येणे-जाणे किंवा राहण्याचा कोणताही भत्ता देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
संपर्क
9921348715
केंद्र प्रमुख : 8830993688
Tags
जिल्हा पालघर