अनोळखी महिलेच्या खूनाचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना यश.


तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान:– दिनांक १३/११/२०२५ रोजी फिर्यादी नामे संदीप राघु भुरकुड, पोलीस पाटील, वय ४२ वर्षे, रा. तलासरी पाटीलपाडा, ता. तलासरी, जि. पालघर यांनी तलासरी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की, मुंबई-अहमदाबाद हायवे रोडचे पुर्वेला, मुंबई-वडोदरा एक्सप्रेस हायवे रोड पुलाचे कामाचे ठिकाणी एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे हिचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून ओढणीने गळा आवळून तिस जिवे ठार मारले आहे अशी फिर्याद दिल्याने तलासरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १ २५३/२०२५ भारतीय न्याय संहिता १०३(१) प्रमाणे दिनांक १४/११/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी तलासरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना वेगवेगळी पोलीस पथके तयार करून अनोळखी मयत महिलेची ओळख पटवून अज्ञात आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या. सदर मयत महिला तसेच अज्ञात आरोपीबाबत काहीएक माहिती नसतांना तलासरी पोलीस ठाणेचे पथकाने गुन्हयातील मयत महिलेचा फोटो विविध प्रसार माध्यमाव्दारे प्रकाशित करुन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे मयताबाबत माहिती काढुन त्याव्दारे तीचे नातेवाईकांचा शोध घेवुन मयत महिलेची ओळख पटाविली असता सदरची महिला हिचे नाव अफसाना हसरतुल बाबदीन खान ऊर्फ अफसाना हसरतुल साकरअली मन्सुरी, वय २५ वर्ष. असे असल्याची खात्री झाली. त्यावरुन मयत महिलेबाबत अधिक तपास केला असता सदर मयत महिलेचा पती नामे साकीरअली मुस्तफाअली मन्सुरी वय-४३ वर्ष, व्यवसाय-चालक, रा. एचपी सीएनजी पेट्रोलपंपचे मागे सारौली सुरत, गुजरात राज्य मुळ रा. ग्राम गिलवली ठाणा सोनवा जि. अकौना जि. सराबस्ती राज्य उत्तरप्रदेश यास आच्छाड बॉर्डर, गुजरात येथुन ताब्यात घेवुन त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांने अनैतीक शारीरिक संबंधाचे कारणावरून नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. नमूद आरोपीस सदर गुन्ह्यात अटक केली असून गुन्ह्याचा पुढिल तपास पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड, तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही श्री. संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र, कोकण भवन, नवी मुंबई, श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती अंकिता कणसे, उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/अजय गोरड, सपोनिरी हेमंत देवरे, मपोउपनिरी योगिता गुजर, पोउपनिरी जितेंद्र कांबळे, पोउपनिरी विकास दरगुडे, पोउनि/अमोल चिंधे, श्रेणी पोउपनिरी एन. के. पाटील, श्रेणी पोउपनिरी एच. एन. पाटील, श्रेणी पोउपनिरी उल्हास पवार, श्रेणी पोउपनिरी जयंत निकम, श्रेणी पोउपनिरी बबन गावीत श्रेणी पोउपनिरी जयराम उमतोल, सफौ हिरामण खोटरे, पोशि/१६० योगेश मुंढे सर्व नेमणूक तलासरी पोलीस ठाणे तसेच पोनि/प्रदिप पाटील, सपोनि/अनिल व्हटकर, पोउपनि/गोरखनाथ राठोड, पोउपनि रोहित खोत, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/विजय ठाकूर, पोना/विशाल लोहार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पार पाडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post