तलासरी प्रतिनिधी :–असरफ खान :– पालघर जिल्हा परिषदेत आज जननायक बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साधेपणाने आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली.तंत्रस्नेही शिक्षक तानाजी डावरे, आनंद अनेमवाड संगणक तज्ञ सतीश साबळे तसेच जिल्हा परिषदेचे इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे महान क्रांतीवीर, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्याचे अतुलनीय योद्धे म्हणून देशभर ओळखले जातात. ब्रिटिश सत्तेविरुद्ध ‘उलगुलान’ या महाविद्रोहाचे नेतृत्व करून त्यांनी आदिवासींच्या हक्क, जंगल-जमिनीचे रक्षण आणि सामाजिक स्वाभिमानासाठी संघर्ष केला. अंधश्रद्धा, शोषण आणि अन्यायाविरुद्ध उभे राहत त्यांनी आदिवासी समुदायात आत्मनिर्भरतेचा आणि शिक्षणाचा संदेश दिला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि त्यागामुळे त्यांना ‘जननायक’ म्हणून गौरवण्यात येते.
अशा थोर महापुरुषाची जयंती आज जिल्हा परिषद येथे साजरी करण्यात आली.
Tags
जिल्हा पालघर