पालघर :-(प्रतिनिधी):- पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत अध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी पूर्ण झाली असून एकूण आठ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे विधिग्राह्य ठरली आहेत. नियम ८ (१७) अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या नमुना दोनच्या यादीनुसार खालील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
वैध उमेदवारांची यादी (अध्यक्ष – पालघर नगरपरिषद):
1. काळे केदार शिवकुमार
पत्ता : लक्ष्मी जनार्दन, जे. व्ही. काळे रोड, लक्ष्मी नारायण मंदिराजवळ, पालघर – ४०१४०४
2. घरत उत्तम मोरेश्वर
पत्ता : मु.पो. नवली, पालघर पूर्व – ४०१४०४
3. ठाकरे राहुल दिनेश
पत्ता : ए-१०४, गार्डन कोर्ट, आदर्श नगर, माहिम-मनोर – ४०१४०४
4. पाटील प्रशांत प्रभाकर
पत्ता : ए-९, रॉयल पॉइंट-२, नवली रोड, पालघर – ४०१४०४
5. पिंपळे उत्तम रमेश
पत्ता : बी-२०७, नेहा अपार्टमेंट, माहिम रोड, विजया बँकेसमोर – ४०१४०४
6. म्हात्रे कैलास सुकऱ्या
पत्ता : आशिर्वाद बंगला, बोईसर रोड, आगरी पाडा, जुना पालघर – ४०१४०४
7. राऊत प्रितम विश्वनाथ
पत्ता : रत्नदिप, घर क्रमांक १४०, अल्याळी, पोस्ट टेंभोडे – ४०१४०४
8. लुलानीया जावेद मजीद
पत्ता : रॉयल पॉइंट, रेल्वे फाटकाजवळ, कचेरी – ४०१४०४
या आठही उमेदवारांनी पालघर नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी आपले नामांकन वैध ठरवून निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे. पुढील टप्प्यात अर्ज मागे घेण्यासाठीची अंतिम तारीख जाहीर होणार असून त्यानंतर अधिकृत अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
पालघरमध्ये आगामी निवडणुकीकडे मतदारांचे लक्ष लागले असून अध्यक्ष पदासाठीची लढत चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Tags
पालघर जिल्हा