दोन दिवसापूर्वी पालघर भाजपा मध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादी श.प. गटाचे तालुका अध्यक्ष काशिनाथ चौधरी यांनी दोन दिवसा पूर्वी आपल्या हजारो कार्यकर्त्यांन सह भाजपात पक्ष प्रवेश केला होता. त्या वेळी भाजप पालघर जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत, खासदार हेमंत सावरा, आमदार भोये हे उपस्थित होते.त्या नंतर समाज माध्यमावर भाजप पक्षाला साधू हत्याकांडातील वॅशिंग मशीन म्हणून ट्रोल करण्यात आले होते. त्या धर्तीवर काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला स्थागिती देण्यात आलेली असल्याने काशिनाथ चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन,या प्रकरणात आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला किती मनस्ताप मीडिया मार्फत सहन करावा लागला,ते सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. मुंबई येथे शिकणारा आपला मुलाला त्याचे वर्ग मित्र तुझे वडील खुनी आहेत का असे प्रश्न विचारून भंडावून सोडत असल्याने त्याने परीक्षा देनेही टाळले असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags
जिल्हा पालघर