अनगरचा एकमताचा कौल! नगराध्यक्षा व सर्व १७ नगरसेवक बिनविरोध निवडून


सोलापूर :- (प्रतिनीधी):-  अनगर (ता. मोहोळ) नगरपंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून सौ. प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांची बिनविरोध निवड होऊन नवे नेतृत्व स्थापन झाले आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षा यांच्याबरोबरच सर्व १७ नगरसेवकही बिनविरोध निवडून आल्याने संपूर्ण नगरपंचायतमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या महत्त्वपूर्ण निवडीमुळे अनगरच्या विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. सौ. प्राजक्ता पाटील यांचे शांत, समंजस आणि विकासाभिमुख नेतृत्व अनगरला पुढील काळात प्रगतीच्या नव्या पर्वाकडे नेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सर्व १७ नगरसेवक व नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना हार्दिक अभिनंदन व भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Post a Comment

Previous Post Next Post