पालघर, तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान:– दि.27 नोव्हेंबर: जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी मुंबई–वडोदरा एक्सप्रेस वेच्या कामांची पाहणी केली. कामाची गती, सुरक्षाव्यवस्था, वाहतूक मार्गांवरील पर्यायी नियोजन आणि प्रगती याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना अधिकारी यांना दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी मुंबई–वडोदरा एक्सप्रेस वेच्या कामांची पाहणी केली. कामाची गती, सुरक्षाव्यवस्था, वाहतूक मार्गांवरील पर्यायी नियोजन करून मुंबई–वडोदरा एक्सप्रेस वे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुलींची शासकीय आश्रमशाळा, वरवाडा येथे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी अचानक भेट देत विद्यार्थिनींशी संवाद साधला. शाळेतील शैक्षणिक सुविधा, निवास व्यवस्था, आहार, स्वच्छता तसेच सुरक्षेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. तसेच विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेत उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकारी वर्गांना दिल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहायक जिल्हाधिकारी तथा डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री तसेच भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण (NHAI), ठाणे येथील व्यवस्थापक उपस्थित होते.
शैक्षणिक संस्थांच्या सुविधा उंचावणे आणि महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचा वेग वाढवणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रथम प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
Tags
जिल्हा पालघर