*तलासरी प्रतिनिधी:– असरफ खान:– डहाणू तालुक्यातील दाभोण साग देव, रणकोळ बेकांगली पाडा, रणकोळ बोडणपाडा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये भारताच्या मार्क्सवादी-लेनिनवादी लाल बावटा पक्षाने बाल दिनाच्या निमित्ताने वह्या, पेन व पेनसिल वाटपाचा कार्यक्रम अयोजित केला. या सामाजिक उपक्रमात जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरू वाघ, लोककल्याण मानवहित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष देव पोरे, डहाणू तालुका सहसचिव कॉम्रेड किरण दुबळा, तसेच कॉम्रेड किशोर कडु, अरविंद दुबळा, शिवा कांबळे, वामन किंडरा, रामजी बरड, सिता जाधव, भारती गुजर, मथुरा भोईर, पार्वती पाडेकर यांसह पाडा व गाव प्रमुख सहभागी होते.बालदिनाचा अर्थ लहान मुलांच्या कल्याणासाठी आणि शिक्षणाच्या वाढीसाठी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणे होय. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. लाल बावटा पक्षाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची आशा व्यक्त करण्यात आली.उपस्थित मान्यवऱ्यांनी बालदिनाच्या या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थीसमुदायाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे शाळा व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Tags
जिल्हा पालघर