धाराशिवमध्ये १७ व १८ नोव्हेंबर रोजी त्रिजिल्हास्तरीय ‘इन्स्पायर अवॉर्ड’ प्रदर्शन*

धाराशिव,लातूर व नांदेड जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण प्रकल्प मांडणी

धाराशिव,दि.१३ नोव्हेंबर (प्रतिनिधी) सन २०२३-२४ व २०२४-२५ या दोन शैक्षणिक वर्षांतील धाराशिव,लातूर व नांदेड जिल्ह्यांचे जिल्हास्तरीय ‘इन्स्पायर अवॉर्ड’ प्रदर्शन यावर्षी धाराशिव जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनासाठी दिलेल्या सूचनांनुसार,हे त्रिजिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन दिनांक १७ व १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ज्ञान प्रबोधिनी,हराळी (ता.लोहारा) येथे होणार आहे.

या प्रदर्शनात एकूण १९९ विद्यार्थी, १९९ पालक,तसेच व्यवस्थापनाशी संबंधित ५० प्रतिनिधी सहभागी होणार असून,याशिवाय प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे १००० विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येईल.

शिक्षण क्षेत्रातील सृजनशीलतेला चालना देणाऱ्या या उपक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे,असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक),जिल्हा परिषद,धाराशिव यांनी केले आहे.
             -----------------------

Post a Comment

Previous Post Next Post