पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– दि. 12 डिसेंबर : जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी जव्हार तालुक्यातील चिंचवाडी व भोपतगड परिसरात विविध विकासात्मक उपक्रमांची पाहणी केली. चिंचवाडी येथील आरोग्य तपासणी शिबिराला जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी भेट देत आरोग्य उपक्रमांचे कौतुक केले.
भोपतगड येथे सामूहिक वनहक्क पट्टे वाटपाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला सोनगीरपाडा-घाटाळपाडा 610.37 हेक्टर. आर
अनंतनगर-कोगदा 192.181 हेक्टर. आर
हाडे-देवीचापाडा 132 हेक्टर. आर
झाप-चिंचवाडी 300 हेक्टर. आर, असे एकूण 1234.551 हे.आर.सामूहिक वनहक्क पट्टे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले.
हाडे (देवीचा पाडा), ऐन (सोनगीर पाडा), चिंचवाडी, कोगदा (अनंतनगर) येथील सामूहिक वनहक्क समित्यांचे अध्यक्ष व सचिव यांना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते सामूहिक.1234.551 आर.हे वनपट्टे प्रदान करण्यात आले. स्थानिक आदिवासी भागांच्या हक्कसंरक्षणासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी भोपतगड किल्ल्याची पाहणी करून, तेथे आयोजित ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांना विकास, हक्कसंरक्षण आणि वनव्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी उपस्थित राहून शंका समाधान सत्रात उत्साहाने सहभाग नोंदविला.
या प्रसंगी वयम संस्थेचे अध्यक्ष मिलिंद थत्ते ,प्रभारी तहसीलदार सुरेश कामडी, उपवनसंरक्षक सैपुन शेख, तसेच महसूल विभाग, वनविभाग, प्रकल्प कार्यालयाचे अधिकार अभयकुमार टकले, श्री. रास्ते, श्री. टीके तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
जिल्हा पालघर