तुळजापूरकरांच्या सहभागाला महाविकास आघाडीचा सलाम; उमेदवारांकडून मतदारांचे मनापासून आभार

तुळजापूरकरांच्या सहभागाला महाविकास आघाडीचा सलाम; उमेदवारांकडून मतदारांचे मनापासून आभार
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; महाविकास आघाडीच्या उमेदवार व पदाधिकाऱ्यांकडून मतदारांना मनःपूर्वक आभार

तुळजापूर : - (प्रतिनिधी) तुळजापूर नगरपरिषद निवडणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली. मतदान प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून आपल्या लोकशाही हक्काचा वापर केला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसून येत होती. महिला, युवक, ज्येष्ठ तसेच पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तुळजापूरकर मतदार बंधू-भगिनींना मनःपूर्वक आभार मानले. आघाडीच्या प्रतिनिधींनी जाहीर निवेदनात म्हटले की,
"तुळजापूरातील जनतेने आज लोकशाहीला बळ देणारा मोठा सहभाग नोंदवला. विकासाच्या दिशेने स्थिर आणि सकारात्मक बदलासाठी मतदारांनी दाखवलेला उत्साह हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आम्ही जनतेचा विश्वास पात्र ठरवण्यासाठी कटिबद्ध राहू."

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेस सहकार्य करणाऱ्या पोलिस प्रशासन, निवडणूक आयोग, शासकीय कर्मचारी, स्वयंसेवक तसेच संपूर्ण मतदारांच्या शांत, संयमी आणि शिस्तबद्ध वर्तणुकीचे कौतुक केले.
तसेच, निवडणूक काळात तुळजापूरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासनाने घेतलेले योग्य निर्णय आणि केलेली तत्पर व्यवस्था याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच उपस्थित काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील, महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर भैया मगर, अमोल कुतवळ, नागनाथ भाऊ भांजी, उत्तम नाना अमृतराव, आदि उपस्थित कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी महिला भगिनींची पुरुषांपेक्षा जास्त संख्या मतदानाच्या वेळेस उपस्थित होते. तसेच आघाडीच्या उमेदवारांनी सांगितले की, “तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहू. नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रोजगार आणि शहराच्या दर्जेदार विकासासाठी ठोस भूमिका घेऊ.”

मतदानामधील मोठ्या सहभागाने तुळजापूरातील लोकशाहीची परंपरा अधिक मजबूत झाली असल्याचे आघाडीने स्पष्ट केले. अखेरीस सर्व उमेदवारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा तुळजापूर शहरातील सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post