तुळजापूर :-(प्रतिनिधी):- धनशक्तीवर जनशक्तीचा विजय – मतदार बांधवांचे आभार : महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर भैया मगर यांची प्रतिक्रिया
नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर भैया मगर यांनी सर्व बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले.
मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडताना दिसल्याने ते समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.
अमर भैया मगर म्हणाले, “धनशक्तीपेक्षा जनशक्ती मोठी. पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेता येत नाही. मतदारांनी घराबाहेर पडून आमच्यावर दाखवलेला विश्वास हा आमच्या कार्याचा आधार आहे. आम्ही विकासाचा मार्ग निवडला असून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू.”
त्यांनी विशेषतः युवा मतदार, महिलांचे गट तसेच ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.
मतदारांनी दिलेल्या प्रेम व पाठिंब्यामुळे आपल्यात नवचैतन्य भरल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी मगर म्हणाले की, “ही लढाई केवळ राजकारणाची नव्हे, तर प्रामाणिकपणा व विकासाच्या मार्गाची आहे. जनतेने दिलेला कौल आम्हाला सकारात्मक बदलांसाठी अधिक बळ देणारा आहे.”
Tags
धाराशिव जिल्हा