तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :– तलासरी गुरुवार, ११ डिसेंबर २०२५ रोजी, वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडचे जनरल पास्टर किम जू-चेओल यांच्या नेतृत्वाखाली, संस्थेच्या सुमारे १५० सदस्यांनी या मोहिमेत भाग घेतला, सकाळी १०:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत तलासरी नगर पंचायतीपासून गोदावरी कॉलेजच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेदरम्यान ४० पिशव्या, म्हणजेच अंदाजे ४०० किलो कचरा गोळा करण्यात आला.
चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटीने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत प्रमुख पाहुणे तलासरी नगराध्यक्ष श्री. सुरेश भोये, तलासरी पोलिस निरीक्षक श्री. अजय गोराड आणि तलासरी आरोग्य विभाग पंचायत समितीचे डॉ. श्रीकांत कुलकर्णी आणि डॉ. ऋतुजा मॅडम होते. या कार्यक्रमादरम्यान, सर्व मान्यवरांनी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले आणि तलासरी नगर परिषदेने प्रमाणपत्रे आणि पुरस्कार प्रदान केले. चर्चचे अध्यक्ष ॲलन आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
चर्च प्रतिनिधी संगीता मॅडम म्हणाल्या, "वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडची स्थापना १९६४ मध्ये दुसरे आगमन करणारे ख्रिस्त आनसांगहोंग यांनी केली होती आणि आज ते माता परमेश्वर, नवीन यरूशलेम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. १७५ देशांमध्ये ७,८०० हून अधिक स्थानिक चर्च आणि ३९ लाखांहून अधिक नोंदणीकृत सदस्यांसह, ते बायबलच्या शिकवणींनुसार प्रेमाचे आचरण करून पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांची सेवा करते. "मदर्स स्ट्रीट" स्वच्छता मोहीम सारखे जागतिक स्वयंसेवक कार्य संयुक्त राष्ट्र (UN) आणि त्याच्या शाश्वत विकास ध्येयांशी (SDGs) सुसंगत आहे. या कार्यासाठी, त्यांना अमेरिका (US) प्रेसिडेंट्स व्हॉलंटियर सर्व्हिस अवॉर्ड, इंग्लंडच्या (UK) राणीचा अवॉर्ड आणि अनेक देशांकडून इतर पुरस्कार मिळाले आहेत." त्यांना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसापत्र मिळाले.
आज, जवळच्या चर्च ऑफ गॉड शाखेचे सदस्य तलासरीच्या महान लोकांसोबत खांद्याला खांदा लावून सेवा करण्यास उत्सुक आहेत.
Tags
जिल्हा पालघर