पालघर बोईसर (प्रतिनिधी) :– अशरफ खान :–सफाळा पोलीस ठाणे यांची यशस्वी कामगिरी
सफाळा पोलीस ठाणे व केळवा पोलीस ठाणे हद्दित अज्ञात चोरट्यांनी विविध अंगणवाडी, चंगले व शाळेतून दरवाजे तोडून गॅस सिलेंडर चोरी केल्याच्या तक्रारी नोंद झाल्या होत्या, त्यावरून सफाळा पोलीस ठाणे येथे गुरनं १६१/२०२५, १६२/२०२५, १६३/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(१), ३३१(४) प्रमाणे तसेच केळवा सागरी पोलीस ठाणे येथे गुरनं ७३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(१), ३३१(४) प्रमाणे असे वेगवेगळे चार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळा पोलीस ठाणेचे विशेष पथक तयार करण्यात आले. सदर पथकांनी घटनास्थळांची पाहणी करून गोपणीय चातमीदारांचे मदतीने तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन आरोपीत १) अजय एकनाथ आंबात, वय ३२ वर्षे, रा. बंदाटे, ता. जि. पालघर, २) चंदू रमेश वळवी, वय २५ वर्षे, रा. देवशेत, ता. जि. पालघर यांना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वर नमूद चारही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. नमूद आरोपी यांना अटक करण्यात येवून त्यांचेकडून एकूण २५ गैस सिलेंडर तसेच मोटारसायकलसह एकूण १,२८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांचा अधिक तपास हा सफाळा पोलीस ठाणे यांचेकडून करण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती प्रभा राऊळ, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/दत्ता शेळके, प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे तसेच सफाळा पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
Tags
जिल्हा पालघर