तुळजापूर : आम् संघर्ष टाईम्स online: प्रतिनीधी
तुळजापूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शहरात मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली. तसेच सकाळपासूनच मतदारांनी उत्साहाने मतदान केंद्रांवर गर्दी केली. लोकशाहीच्या या महोत्सवात सर्वच स्तरातील नागरिकांनी सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटू (भैय्या) गंगणे यांनी तुळजापूरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ते म्हणाले, “तुळजापूरमधील सर्व मतदार बंधू भगिनीचे मी मनापासून आभार मानतो. भाजप नेते व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाबद्दल तसेच कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रम व प्रेमाबद्दल मी ऋणी आहे.”
विनोद पिंटू गंगणे यांनी पुढे सांगितले की, “जनतेसाठी काम करण्याची माझी निष्ठा कायम राहील. तुळजापूरकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.”
तुळजाभवानीच्या नगरीत मतदानाची प्रक्रिया कोणताही गोंधळ, अडथळा न येता पार पडल्याने नागरिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. शांततेत आणि उत्साहात पार पडलेला हा मतदानाचा दिवस तुळजापूर शहरासाठी लोकशाहीचा खरा उत्सव ठरला.
Tags
धाराशिव जिल्हा