जव्हार पीडब्ल्यूडी १११.६३ कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी निलेश पडवळे उर्फ पिंका याला अटक.

बोईसर  (प्रतिनिधी) :–विकास सिंह :– जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग  कार्यालयातील कामांची सुरक्षा अनामत रक्कम बँकेतून ठेकेदाराच्या नावे काढण्याचा डाव फसला आहे. 111कोटी 63 लाख रुपये इतकी मोठी रक्कम बँकेतून काढताना जव्हार एसीबीआय बँकेतील कर्मचाऱ्याच्या लक्षात आले, आणि त्याच्या सतर्कते मुळे अधिकारी व ठेकेदारांचा  डाव फसला आहे.

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग  कार्यालयातील कामांची  १११.६३ कोटींची सुरक्षा अनामत रक्कम बँकेतून ओवी कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराच्या नावे काढण्याचा प्रयत्न होता.

 जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकारी व कर्मचारी आणि ठेकेदार पडवळे यांच्या संगनमताने सरकारला कोट्यावधी रुपयांचा चुना लावण्याचा डाव होता. या कथित घोटाळ्याप्रकरणी ओवी कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि जिजाऊ संघटनेचे विक्रमगड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष निलेश (पिंका) पडवळे याला पालघर पोलिसांनी ठाणे येथून अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post