तुळजापूर :- आम संघर्ष टाइम्स online :- (प्रतिनिधी) नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात प्रचाराला वेग आला असून विविध पक्षांचे उमेदवार मतदारांशी संपर्क साधत आहेत. भाजपच्या वतीने माजी नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी, सौ. प्रियांका विजय गंगणे तसेच माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गंगणे हे प्रभाग क्रमांक १० मध्ये जोरदार जनसंपर्क करत आहेत. तसेच
उमेदवारांनी गोरगरीब, सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू, तसेच शहराच्या विकासाला चालना देऊ, असे आश्वासन मतदारांना दिले आहे.शहरातील शुद्ध पाणी, स्वच्छता, गटारनाळ्या, रस्ते दुरुस्ती आणि इतर मूलभूत सुविधा या प्रश्नांवर विशेष लक्ष देण्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे. तसेच प्रचाराच्या दरम्यान उमेदवारांनी श्री तुळजा भवानी मंदिर परिसरात आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद (पिटू भैय्या) गंगणे आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे 865 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले. या निधीमुळे तुळजापूर शहराचा कायापालट होईल, असा दावा करण्यात आला.दरम्यान, प्रभाग क्रमांक १० अ आणि १० ब मध्ये दिवसरात्र घराघरांमध्ये सचिन रोचकरी आणि प्रियंका गंगणे दाम्पत्य यांनी मतदारांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. स्थानिक मतदारांकडून प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत यावेळी जोरदार चुरस निर्माण झाली असून सर्वच पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न चालु आहेत.
Tags
धाराशिव जिल्हा