प्रभाग ९ मध्ये बदलाची हाक! अमोल कुतवळ आघाडीवर



तुळजापूर :-  आम् संघर्ष टाईम्स online (प्रतिनिधी) :-  आई श्री कुलस्वामीनी तुळजाभवानी तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला जोर येत असून प्रभाग क्र. ९ मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून जनसेवक आमोल माधवराव कुतवळ व सौ. मोनिका श्रीकांत कदम हे जोरदार पद्धतीने रिंगणात उतरले आहेत. तसेच त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे दिसून येत आहे.तसेच
प्रभाग क्रमांक ९ मध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत राहून अमोल कुतवळ यांनी समाजसेवा, जनसंपर्क आणि लोकांच्या  समस्या सोडविण्यात मोठे प्रयत्न केले आहेत. तसेच पाणीटंचाई, वीज समस्या, कचरा व्यवस्थापन, गटारी स्वच्छता असे अनेक प्रश्न हाताळत त्यांनी जनतेत विश्वास निर्माण केला आहे. सामाजिक उत्सवांचे आयोजन करून सर्वधर्म समभाव जपत त्यांनी प्रभागातील ऐक्य बळकट केले आहे. तसेच मागील विधानसभा निवडणुकीत तुळजापूर शहरातील प्रचारप्रमुख म्हणूनही त्यांनी मोठ्या ताकदीने काम करत अनुभव मिळवला. तीन टर्मपासून नगरपरिषदेच्या कारभारातील निष्क्रियतेमुळे कंटाळलेल्या जनतेमध्ये आता बदलाची भावना  असून, विकासाभिमुख नेतृत्वाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.आई श्री तुळजाभवानी मंदिराची महती जागतिक स्तरावर पोहोचवण्याची, भाविकांच्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्याची, तसेच संत गजानन महाराज शेगाव संस्थानप्रमाणे निस्वार्थी व नियोजनबद्ध विकास घडवण्याची भूमिका अमोल कुतवळ यांनी स्पष्ट केली आहे. शहरातील स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गटारी स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, पुजारी वर्गाच्या समस्या, भाविकांच्या सोयी-सुविधा अशा अनेक विकासकामांची आवश्यकता त्यांनी नमूद केली आहे. तुळजापूर शहरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला कोणतीही अडचण येऊ नये, तो समाधानाने दर्शन घेऊन परत जावा, हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागातील तरुणांसाठी तयार केलेले  मैदान ही त्यांची विशेष कामगिरी असून, याच मैदानावर त्यांच्या उमेदवारीचा "पिच" अधिक भक्कम झाल्याचे नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील मतदारांमध्ये अमोल कुतवळ व मोनिका कदम यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, ते दिग्गज विरोधकांसमोर दमदार आव्हान ठरत असल्याचे प्रभागातून नागरिक चर्चा व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post