नगरपरिषद निवडणूक : तुळजापूरमध्ये भाजपची शक्तीप्रदर्शन रॅली उत्साहात पार


तुळजापूर : प्रतिनिधी : आम संघर्ष टाइम्स  online नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. विनोद पिटु गंगणे तसेच नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ तुळजापूर शहरात भव्य रॅली व प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी बोलताना भाजपा पदाधिकाऱ्यांनी तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचे आश्वासन दिले. शहरातील प्रत्येक प्रभागात विकासकामांना प्राधान्य देत नागरिकांच्या सूचनांनुसार, त्यांच्या विश्वासात घेऊनच सर्व कामे राबवली जातील, असा विश्वास उपस्थितांना देण्यात आला.

तुळजापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विकासाला नवी दिशा देण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले. आगामी २ तारखेला होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून तुळजापूरच्या विकासाला आणखी बळ द्यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

सभा आणि रॅलीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती जाणवून उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post