प्रभाग ३ मधील भाजपच्या भव्य प्रचार फेरीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद


धाराशिव : (प्रतिनीधी):- आम संघर्ष टाईम्स online नगरपरिषद  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या भव्य प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे तसेच प्रभाग ३ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. वैशाली सुशांत सोनवणे आणि  संदीप इंगळे यांच्या प्रचारार्थ ही फेरी काढण्यात आली.

विठ्ठल–रुक्मिणी मंदिर दर्शनाने प्रारंभ झालेल्या या प्रचार फेरीत विकासाच्या संकल्पनांचा जयघोष करण्यात आला. प्रभागातील अनेक स्थानिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उमेदवारांवरील जनतेचा वाढता विश्वास आणि उत्साह पाहता या प्रभागात भाजपला वाढत चाललेले जनसमर्थन स्पष्टपणे जाणवत होते.

धाराशिवच्या एकूणच प्रगतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा ठाम विश्वास असून नगरपरिषदेत भाजपची सत्ता आणण्यासाठी जनतेमध्ये सकारात्मक भावना दिसून येत आहे. एकेकाळी १०० टँकरवर अवलंबून असलेल्या शहरासाठी राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने उजनी पाणीपुरवठा योजना सुरळीत राबवण्यात आली. पुढील काळात प्रत्येक घरात २४ तास स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे, रस्ते–नाली सुधारणा, विद्युत सुविधा उन्नत करणे या विकासकामांसाठी आमदार पाटील सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. शहरातील

Post a Comment

Previous Post Next Post