पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर व मुंबई विभागाचे उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राजगुरु ह. म. पंडित विद्यालय, सफाळे व टिमा यांच्या सहकार्याने विभागस्तरीय युवा महोत्सव सन 2025-26 भव्य उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन TIMA (तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) हॉल, बोईसर येथे करण्यात आले.या स्पर्धेत विविध कला, कौशल्य आणि नवोपक्रमाचे दर्शन या महोत्सवात घडले. उद्घाटन प्रसंगी पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड मॅडम उपस्थित होत्या. युवा महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, क्रीडेसोबत प्रत्येकाच्या अंगी कलागुण असणं खूप गरजेचं आहे. चित्रकला, कथालेखन, कविता लेखन, विज्ञान प्रदर्शन, लोकगीत, लोकनृत्य आणि वक्तृत्व यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण होतो. आपण हा आनंद मिळवला पाहिजे.
या युवा महोत्सवात सांस्कृतिक विभागात समूह लोकनृत्य व समूह लोकगायन यांसारख्या पारंपरिक कलांना मुला-मुलींनी दिमाखदार सादरीकरणातून उजाळा दिला. तर नवोपक्रम विभागात विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे सुंदर दर्शन घडविले. कौशल्य विकास विभागात कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि कविता लेखन अशा सर्जनशील स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेची उत्तम छाप पाडली. युवा महोत्सवातून युवकांना आपली कला, बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष कौशल्ये सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि स्थानिक मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समारोपाच्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, जिल्हा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, प्राचार्या मधुमती कुलकर्णी, गिरीश इरनक, भक्ती आंब्रे, अमृत घाडगे, मयूर खोल्लम आणि सर्व परीक्षक उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
कविता लेखन स्पर्धा
प्रथम क्रमांक - प्रिया राठोड पालघर
द्वितीय क्रमांक - मृणाली पाटील ठाणे
तृतीय क्रमांक - पूजा पांडे मुंबई उपनगर
कथालेखन स्पर्धा
प्रथम क्रमांक - ईशांत मेहरा ठाणे
द्वितीय क्रमांक - पूजा पांडे मुंबई उपनगर
तृतीय क्रमांक - मनाली चौधरी मुंबई उपनगर
वक्तृत्व स्पर्धा
प्रथम क्रमांक - आशुतोष शुक्ला पालघर
द्वितीय क्रमांक - पूजा पांडे मुंबई उपनगर
तृतीय क्रमांक - अंश राय पालघर
चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक - कशिश गणेश तिखे रायगड
द्वितीय क्रमांक - विकास राजभर ठाणे
तृतीय क्रमांक - जीनल माच्छी पालघर
विज्ञान व तंत्रज्ञान स्पर्धा
प्रथम क्रमांक - बी एन बांदोडकर सीनियर कॉलेज ठाणे
द्वितीय क्रमांक - बी एन बांदोडकर ज्युनिअर कॉलेज ठाणे
तृतीय क्रमांक - होली चाइल्ड सीबीएससी स्कूल रायगड
लोकगीत स्पर्धा
प्रथम क्रमांक - सी के टी कॉलेज पनवेल जिल्हा रायगड
द्वितीय क्रमांक - सह्याद्री कॉलेज जुचंद्र पालघर
तृतीय क्रमांक- इंदिरा गांधी विद्यालय मुंबई उपनगर
लोकनृत्य स्पर्धा
प्रथम क्रमांक - सह्याद्री महाविद्यालय जुचंद्र वसई
द्वितीय क्रमांक - सी के टी कॉलेज पनवेल जिल्हा रायगड
तृतीय क्रमांक - बी.ए. बांदोडकर कॉलेज ठाणे
Tags
जिल्हा पालघर