तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :– पालघर दिनांक 16: भारत सरकारने धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचा जन्मदिन अर्थात 15 नोव्हेंबर हा दिवस *"जनजाती गौरव दिन"* घोषित केला आहे.
गेले तीन महिने राज्यभर आदिवासी विकास विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक तथा गुणदर्शन स्पर्धा व समाजाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, प्रकल्प अधिकारी जव्हार डॉ. अपूर्वा बासुर,प्रकल्प अधिकारी, डहाणू विशाल खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार व डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हास्तरीय जनजाती गौरव दिन जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे उत्साहात संपन्न झाला.
ह्यावेळी आश्रमशाळा कुंर्झे ता. विक्रमगड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतातून क्रांतिकारकांना अभिवादन केले . प्रणाली टोकरे ह्या विद्यार्थिनीने राणी दुर्गावतींवर आधारित सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
ह्या कार्यक्रमादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथून देशाला उद्देशून केलेले मनोगत सभागृहात ऑनलाईन पद्धतीने दाखविण्यात आले.
सहायक प्रकल्प अधिकारी दिपक टिके, बन्सीलालजी पाटील,नियोजन अधिकारी सतीश रास्ते, कार्यालयीन अधीक्षक योगेश खंदारे, विठ्ठलजी कुरवाडे,संशोधन अधिकारी जगदीशजी पाटील, निरीक्षक श्याम चिंचमलातपुरे व गृहपाल, मुख्यध्यपक इतर मान्यवर उपस्थित होते
ह्या गौरव दिनाचे प्रास्ताविक बन्सीलाल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दिपक टिके यांनी केले.
हा गौरवाचा क्षण यशस्वी होण्यासाठी जिल्हधिकारी कार्यालय, दोन्ही प्रकल्प कार्यालयांचे अधिकारी,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tags
जिल्हा पालघर