उद्योजकता विकासाचे दीपस्तंभ डॉ. अभिराम डबीर यांची सेवानिवृत्ती*

पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :–  डॉ अभिराम विजया सुरेश डबीर हे मूळ निवासी अमरावती, सध्या कार्यरत पुणे येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी. ई.डी.) येथे विभागीय अधिकारी पदावरून ३२ वर्षांची उद्योजकता विकास चळवळी मधली आपली उद्योजकीय प्रेरक प्रशिक्षक अशी प्रदीर्घ कारकीर्द अत्यंत समर्थपणाने  पार पाडून नोव्हेंबर २०२५ अखेरीस निहित वयोमानानुसार सन्मानपूर्वक पुणे येथून निवृत्त होत आहेत. उद्योजकता आणि कौशल्य विकास क्षेत्रात अनेक विविध नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि उपक्रम राबवताना त्याद्वारे जास्तीत जास्त उद्योजक निर्मिती करण्यावर त्यांचा कायम आयुष्य भर भर राहिला आहे. याचे फलित म्हणून जिल्हा,राज्य, आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांचा सर्वोत्कृष्ट उद्योजकता प्रेरक प्रशिक्षक म्हणून नेहरू युवा केंद्र, MCED आणि EDII भारतीय उद्यमिता विकास संस्था या अत्यंत प्रतिष्ठित आणि मानाच्या संस्थांतर्फे अनुक्रमे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरवांकित करण्यात आले आहे. अत्यंत उच्च विद्याविभूषित असलेले डॉ. अभिराम डबीर यांचे उद्योजकता आणि मराठी उद्योजकीय साहित्य यावरील संशोधन आणि आजपर्यत  विविध राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर  विविध उद्योजकता संशोधन लेख, आणि व्याख्याने ही उद्योजकता क्षेत्राला मिळालेली मौलिक अशी ठेव आहे. उद्योजक या MCED प्रकाशित मासिकाचे विभाग प्रमुख आणि त्यातील त्यांचे मागील ३० वर्षातील अभ्यासपूर्ण लेख  हे त्यांच्या उद्योजकीय,आर्थिक, सामाजिक चिकित्सक व्यासंगाचे द्योतक आहेत.महाराष्ट्राच्या तळागाळात आपलं उद्योजकीय योगदान प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी समर्थपणे आजपर्यत दिलेले आहे. त्यांची ही कारकिर्द निवृत्ती नंतरही अशीच कायम वृद्धिंगत होत राहो. यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पालघर यांच्या वतीने मनोकामना आणि त्यांच्या राज्यातील आणि देशातील सर्व शुभेच्छुक  हितचिंतक आणि प्रिय जणांकडून मनःपूर्वक शुभेच्छा.

Post a Comment

Previous Post Next Post