*जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी आदेश केले पारीत*
पालघर, (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :–
दि. 25 नोव्हेंबर: राज्य निवडणूक आयोग, यांच्या निर्देशांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद तसेच वाडा नगरपंचायतीसाठी मतदान व मतमोजणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवार, दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान तर बुधवार, दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे.
निर्वाचन प्रक्रिया मुक्त, पारदर्शक व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी संबंधित क्षेत्रांत ‘ड्राय डे’ घोषित केले आहेत. महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम, १९४९ तसेच निवडणूक आयोगाच्या ०४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये हा निर्णय घेण्यात आला आहे.
ड्राय डेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :
दि. ०१ डिसेंबर २०२५ — मतदानाच्या पूर्वीचा दिवस : पूर्ण दिवस सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या बंद
दि. ०२ डिसेंबर २०२५ — मतदानाचा दिवस : पूर्ण दिवस मद्यविक्री बंद
दि. ०३ डिसेंबर २०२५ — मतमोजणीचा दिवस : मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद
सदर बंदी पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषदा व वाडा नगरपंचायती या सर्व ३ नगरपरिषद व १ नगरपंचायत क्षेत्रांमध्ये लागू राहील.
ड्राय डे दरम्यान अनुज्ञप्तीधारकांनी मद्यविक्री केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी दिला असून सर्व संबंधितांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले.
Tags
जिल्हा पालघर