*मॅरेथॉन आणि स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा*
*...जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड*
पालघर, जिल्हा प्रतिनिधी :–(अमीन मेमन) :– दि 6 डिसेंबर : जिल्ह्यातील डहाणू–बोर्डी समुद्रकिनारा ७ डिसेंबर २०२५ रोजी एका भव्य आणि ऐतिहासिक उपक्रमाचा साक्षीदार ठरणार आहे. वन विभाग , महाराष्ट्र शासन आणि आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे डहाणू–बोर्डी बीच मॅरेथॉन आणि मेगा बीच क्लीन-अप ड्राइव्ह २०२५ आयोजित करण्यात आला असून, एका दिवसात एका ठिकाणी सर्वाधिक स्वयंसेवकांच्या सहभागातून प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मॅरेथॉन आणि स्वच्छता मोहिमेमध्ये विद्यार्थी,नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डहाणू प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या नियंत्रणाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
*१८ किमी किनारपट्टीवर महास्वच्छता*
डहाणू–बोर्डीचा १८ किमी लांबीचा किनारा ९ ते १० झोनमध्ये विभागून कचरा संकलन, वर्गीकरण आणि वजनाची प्रक्रिया गिनीज बुकच्या नियमांनुसार काटेकोरपणे केली जाणार आहे. या दिवशी २.५ ते ३ टन प्लास्टिक कचरा हटवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
*३,००० धावपटू; ८,००० स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग*
या उपक्रमात ३,००० पेक्षा अधिक धावपटू, तर ७,००० ते ८,००० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. एनसीसी, एनएसएस, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ, मत्स्यव्यवसायिक, पर्यावरण कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला जात आहे.
*धावपटूंकरिता तीन स्पर्धांमध्ये सहभागाची संधी*
२१ किमी Blue Planet Half Marathon
१० किमी Mangrove Run
५ किमी Wave Run
संपूर्ण मार्गावर मेडिकल सपोर्ट, वॉटर स्टेशन आणि स्वयंसेवकांची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे.
*सविस्तर कार्यक्रम वेळापत्रक*
सकाळी ५:३० ते ७:००
२१ किमी धावण्याची नोंदणी व बिब वितरण
वैद्यकीय तपासणी, वॉर्म-अप, स्वयंसेवक तैनाती
सकाळी ७:००
२१ किमी मॅरेथॉनला दिमाखात प्रारंभ
सकाळी ७:०० ते ८:००
१० किमी स्पर्धेची नोंदणी
सकाळी ८:३०
१० किमी मॅन्ग्रोव्ह रनला सुरुवात
सकाळी ७:३० ते ९:००
५ किमी वेव रन नोंदणी
सकाळी ९:००
५ किमी धावण्यास प्रारंभ
सकाळी ८:३० पासून
नाश्ता, प्राथमिक उपचार व विश्रांती व्यवस्था
सकाळी १०:०० ते ११:००
भव्य बीच क्लीन-अप ड्राइव्ह
गिनेस रेकॉर्डसाठी स्वयंसेवकांची मोठी चळवळ
सकाळी ११:०० ते १२:००
बक्षीस वितरण व सत्कार सोहळा
दुपारी १२:००
सर्व सहभागी यांच्यासाठी भोजन व्यवस्था
हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
सहभागाकरिता नावनोंदणी
https://www.townscript.com/e/dahanubordi-beach-marathon-2025
अधिकृत माहिती: https://outplaysports.org/dahanu-bordi-beach-marathon/
सविस्तर माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा
सुनिल: 9702119996
विकास: 9987013727
प्रविण: 7021074762
शाम: 9324292727
विद्या: 7977662944
ही मॅरेथॉन केवळ धावण्याची स्पर्धा नाही
हा आहे निसर्गरक्षणाचा सामूहिक संकल्प, एकत्र येऊन स्वच्छता आणि संवर्धनाचा उत्सव आपण साजरा करू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला
*सी टर्टल रिलीज’ उपक्रम*
डहाणू–बोर्डी किनारपट्टी ७ डिसेंबर २०२५ रोजी इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री आणि कोस्टल गार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डहाणू–बोर्डी बीच मॅरेथॉन 2025 आणि महास्वच्छता अभियानाची तयारी करण्यात आली असून हा उपक्रम जिल्ह्याचा विकास आणि पर्यावरण संवर्धनातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
या भव्य मॅरेथॉनमध्ये 5 कि.मी., 10 कि.मी. आणि 21 कि.मी. अशा तीन श्रेणींमध्ये स्पर्धा होणार आहे.
पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाचा नवा अध्याय
स्पर्धेसोबतच Blue Flag Activities Launch, Palghar Tourism Launch आणि आकर्षक Turtle Race यांसारखे उपक्रमही राबवले जाणार आहेत. यामुळे डहाणू–बोर्डी किनाऱ्याच्या पर्यटनाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.
*सी टर्टल रिलीज – युवकांसाठी प्रेरणादायी क्षण*
या उपक्रमाचा आणखी एक आकर्षण म्हणजे Sea Turtle Release हा सहभाव आणि संवेदनशीलतेचा उपक्रम. समुद्री जीवसृष्टीचे महत्त्व सांगणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना दृढ करणार आहे.
“डहाणू–बोर्डीचा किनारा, समुद्री परिसंस्था आणि पर्यटन यांचे दीर्घकालीन संवर्धन हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. युवक, विद्यार्थी, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ही एका पिढीची पर्यावरणासाठी घेतलेली सकारात्मक झेप आहे,” असे मत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केले.
Tags
जिल्हा पालघर