नौकानयन , सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण सत्र. १२२ वे साठी अर्ज सादर करावे*


पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– पालघर दि. ०९ : मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वसई, पाचूबंदर हे राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे आहे. येथे सागरी मत्स्यव्यवसायाशी संबंधित नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाचे प्रशिक्षण दिले जाते.

या केंद्रात देण्यात येणारे प्रशिक्षण ६ महिन्याच्या कालावधीचे असून सदयाचे प्रशिक्षण वर्ग दिनांक ०१/०१/२०२६ ते ३०/०६/२०२६ पर्यंत आहे. अर्जाचे नमुने मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वसई यांच्या कार्यालया उपलब्ध आहेत. कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळून त्यांच्या घेऊन जावेत. परिपूर्ण अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३०/१२/२०२५ राहील. या प्रशिक्षण वर्गासाठी २२ विद्यार्थी घेण्यात येणार आहेत.

दारिद्रय रेषेखालील विदयार्थ्यांना रु.१००/- प्रतिमहा व दारिद्रय रेषेवरील विद्यार्थ्यांना रु.४५०/- प्रतिमहा प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येते.

या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पात्रता खालील प्रमाणे 

उमेदवाराचे वय १८ तजे ३५ वर्षे असावे.
उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे.
उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.
 उमेदवार क्रियाशिल मच्छिमार असावा.
 उमेदवारास किमान एक वर्षे मासेमारीचा अनुभव असावा.

प्रवेश अर्ज सविस्तर माहितीसाठी या केंद्राचे  ज्ञानेश्वर भोसले, यांत्रिकी निदेशक, वसई  क्रमांक ८६२४९१९११३,  नागेश  पवार, वरिष्ठ लिपिक, वसई  9527786496 व  हेमंत  कोरे, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वसई   क्रमांक ९८२३०४११८९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post