पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :–आज, ६९वा महापरिनिर्वाण दिन साजरा करताना भारतभरातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञतेची आणि आदराची भावपूर्ण मानवंदना अर्पण केली जात आहे. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे ज्योतिर्मय प्रतीक असलेल्या डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना प्रत्येक माणसाला “माणूस म्हणून जगण्याचा अधिकार” मिळावा, हीच जीवनभराची लढाई लढली.
वंचित, व-दलित, शोषित आणि उपेक्षित समाजाला स्वाभिमानाने उभं करण्यासाठी त्यांनी दिलेल्या विचारांची आज अधिकाधिक गरज भासत आहे. त्यांचे शिक्षण, समानता आणि प्रगल्भ लोकशाहीवरील विचार आजही मार्गदर्शक दीपस्तंभ ठरत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिदिनी संघर्ष टाइम्स तर्फे त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम.
त्यांच्या विचारांचा प्रकाश समाज परिवर्तनाच्या प्रत्येक वाटचालीला दिशा देत राहो...
Tags
जिल्हा पालघर