नौकानयन ,सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणसाठी अर्ज सादर करावे*


पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– दि. ५ डिसेंबर : मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सातपाटी हे केंद्र राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे आहे. येथे सागरी मत्स्यव्यवसायाशी संबंधित नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाचे प्रशिक्षण दिले जाते.

या केंद्रात देण्यात येणारे प्रशिक्षण ६ महिन्यांच्या कालावधीचे असुन सदयाचे प्रशिक्षण वर्ग दि.01/01/2026 ते दि.30/06/2025 पर्यंत आहे. अर्जाचे नमुने मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, सातपाटी यांच्या कार्यालयातुन कार्यालयीन वेळेत व सार्वजनिक सुट्टीचे दिवस सोडून  घेऊन जावेत. परिपूर्ण अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि.30/12/2025 राहील. या प्रशिक्षण वर्गासाठी 22 विद्यार्थी घेण्यात येणार आहेत.

दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना रु.100/- प्रतिमहा तर दारिद्ररेषेवरील विद्यार्थ्यांना रु.450/- प्रतिमहा प्रशिक्षण फि आकारण्यात येते.

या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पात्रता खालील प्रमाणे असावी.

उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे.

उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे.

 उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.

उमेदवार क्रियाशिल मच्छिमार असावा.

 उमेदवारास किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा.

प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर उमेदवारास रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तरी 

प्रवेश अर्ज तसेच सविस्तर माहीतीसाठी या केंद्राचे  ज्ञानेश्वर  भोसले , यांत्रिकी निर्देशक, सातपाटी भ्रमणध्वणी क्र.8624919113 व  कृणाली तांडेल, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, सातपाटी यांच्यांशी  9158037132 या भ्रमणध्वणीवर संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post