पुणे – जिल्हा (प्रतिनिधी):- सत्यम सोनकांबळे
भारतातील डायरेक्ट सेलिंग उद्योगात नवीन उर्जा, नव्या रणनीती आणि उच्च व्यावसायिकतेचा नवा अध्याय लिहिणारे उद्योजक श्री विकास कुलकर्णी आज देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. केवळ काही वर्षांत त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांवर, प्रशिक्षण पद्धतीवर आणि डिजिटल मार्केटिंगच्या नवकल्पनांवर आधारित एक भक्कम नेटवर्क उभारत उद्योगक्षेत्रात मोठे स्थान निर्माण केले आहे.
शून्यातून उभारलेले साम्राज्य
अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या श्री विकास कुलकर्णी यांनी सुरुवातीला (Asclepius Wellness Private Limite) डायरेक्ट सेलिंगची वाटचाल सुरू केली. सुरुवातीच्या अडचणी, नकार आणि आर्थिक अडथळे यांवर मात करत त्यांनी
सतत शिकण्याची वृत्ती
नियोजनबद्ध काम
लोकांशी नात्यांची उभारणी
आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
या आधारावर मजबूत नेटवर्क तयार केले.
नवीन नेतृत्वशैलीची देशभर चर्चा
श्री विकास कुलकर्णी यांची “People First” ही नेतृत्वशैली त्यांच्या टीमला विशेष प्रेरणा देते. ते स्वतःच्या टीम सदस्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, कौशल्यविकास प्रशिक्षण आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक तांत्रिक साधने उपलब्ध करून देतात.
तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस संपूर्ण महाराष्ट्रातून व देशातून कौतुक केले जात आहे.
Tags
पुणे जिल्हा