आज, दि. २७ जुलै २०२६ (सोमवार) रोजी ग्रामपंचायत कार्यालय, कुडूस (ता. वाडा, जि. पालघर) येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, 'मिसाइल मॅन' आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कुडूस गावचे उपसरपंच मुदत सरजी पटेल, ग्रामविकास अधिकारी किरणजी हरड, उद्योजक अविनाशजी चौधरी, समाजसेवक व पत्रकार अमिनजी मेमन तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. कलाम यांच्या राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श युवकांनी अंगीकारून शिक्षण, विज्ञान, संशोधन आणि राष्ट्रसेवेच्या कार्यात पुढे यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Tags
पालघर जिल्हा