तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी


आम् संघर्ष टाईम्स : तुळजापूर (प्रतिनिधी) : अपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयात नुकतेच ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात तुळजापूर शहरातील तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनव आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त प्रयोगाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शाळेचे विद्यार्थी श्रेयस सुरज बागल व समर्थ संतोष दुलंगे यांनी पावसाच्या पाण्याची साठवणूक कशी करता येईल, यावर आधारित विज्ञान प्रयोग सादर केला. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्यामुळे अनेकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. मात्र, हेच पाणी योग्य पद्धतीने साठवून ठेवल्यास पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते, असा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगातून दिला.
या उपयुक्त व सामाजिक भान जपणाऱ्या प्रयोगाला उपस्थित मान्यवर, परीक्षक व शिक्षकांकडून चांगली दाद मिळाली. विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे विशेष कौतुक करण्यात आले.
या विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. फाटे तसेच शिक्षक टी. डी. कोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना समजून घेऊन त्या प्रत्यक्ष प्रयोगाच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्याची संधी मिळाली.

Post a Comment

Previous Post Next Post