तुळजापूर : प्रतिनिधी : आम संघर्ष टाइम्स online
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरातील ‘भवानीशंकर सभा मंडप’ उभारणीच्या कामाने आता अंतिम टप्पा गाठला असून या कामाची सविस्तर तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडुन पाहणी आज करण्यात आली. तसेच प्राचीन स्थापत्यशैली आणि आधुनिक कौशल्याचा उत्कृष्ट संगम साधत सुरू असलेले हे काम मंदिराच्या वैभवात मोलाची भर घालणारे ठरणार आहे.
या भव्य प्रकल्पांतर्गत नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथून आणलेल्या सुमारे १,६०० घनफूट काळ्या पाषाणातून तब्बल ३९ आकर्षक व भव्य खांब साकारले जात आहेत. मंदिराचे मूळ ऐतिहासिक स्वरूप जपत पारंपरिक शैलीतच या खांबांची निर्मिती करण्यात येत आहे.या कामासाठी राजस्थान व उत्तर प्रदेशातील १२ कुशल कारागीर दिवसरात्र मेहनत घेत असून खांबांच्या कोरीव कामाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे देखणे खांब सभा मंडपात बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.आई तुळजाभवानीच्या कृपेने हे भव्य आणि ऐतिहासिक कार्य लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी भाविकांमध्ये अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्या समयी उपस्थित मंदीर तहसीलदार माने मॅडम, माजी नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
Tags
धाराशिव जिल्हा