शाहूनगर जेतवन कॉलनीत क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची १९९वी जयंती उत्साहात साजरी


धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव शहरातील शाहूनगर जेतवन कॉलनी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास धाराशिव नगर परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत भैया काकडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी प्रा. महेंद्र चंदनशिवे, अशोक हजारे, राम राऊत, सचिनदादा शिंगाडे, अनंत वाघमारे, नाना वाघमारे, प्रा. भालेराव, रमाकांत गायकवाड, सुबोध शिंगाडे, अमित शिंगाडे, सुमित चंदनशिवे, सिद्धांत राऊत, बाळासाहेब माने, रोहन शिंगाडे, अनंत घाडगे, मेजर मोहन वाघमारे, सिरसाट, सौर्य शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रा. राम चंदनशिवे यांनी व्यक्त केले. यावेळी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त वर्षभर विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सचिनदादा शिंगाडे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post