धाराशिव | प्रतिनिधी : online आम् संघर्ष टाईम्स नळदुर्ग येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसवराज धरणे, तुळजापूर येथील विनोद उर्फ पिटु गंगणे, धाराशिव येथील सौ. नेहाताई राहुल काकडे तसेच कळंब येथील सौ. सुनंदा कापसे यांचा प्रतिष्ठान भवन, भाजपा कार्यालय, धाराशिव येथे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शहरांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या पायाभूत सुविधा, विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांमध्ये प्रभावी, पारदर्शक व लोकाभिमुख कार्य घडवून आणण्याचे आवाहनही करण्यात आले.
या चारही नगरपालिकांमध्ये पारदर्शक, गतिमान व विकासाभिमुख कारभार राबवला जाईल, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शहरांच्या प्रगतीसाठी ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.