तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान:–
दिनांक 19/12/2025 रोजी किनिस्ते केंद्राच्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा आज जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे संपन्न झाल्या कार्यक्रमाच्या उदघाटण प्रसंगी बिट विस्तार अधिकारी भरत गारे कोचाळे कारेगाव ग्रामपंचायत चे सरपंच मुरलीधर कडू उपसरपंच मिलिंद बदादे , करोळ पाचघर ग्रामपंचायत चे सरपंच नरेंद्र येले, केंद्रप्रमुख रवींद्र नेर माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई झोले मॅडम व माजी उपसभापती प्रदीप जी वाघ उपस्थित होते. केंद्रातील नऊ शाळेमधील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा, समूह गान स्पर्धा व नाट्य स्पर्धा यामध्ये सहभाग घेतला विजेत्यांना बक्षिसे ग्रुप ग्रामपंचायत कारेगाव कोचाळे यांच्यामार्फत देण्यात आली तसेच किनीस्ते केंद्रामध्ये विविध गुणदर्शन स्पर्धेसाठी गेल्या दहा वर्षापासून दिला जाणारा फिरता चषक माजी सभापती प्रदीप जी वाघ साहेब यांच्या सौजन्याने देण्यात आला कोचाळे शाळेने सर्व प्रकारात पहिला नंबर मिळवला. भाषण, वादविवाद, समूहगीत,लहान मोठा गट आणि नाटक यां सर्व प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून इतिहासं घडवला, सर्व स्पर्धांचे परीक्षण सेवानिवृत्त केंद्रप्रमुख राजेंद्र जागले साहेब व सेवानिवृत्त शिक्षक एल एम अहिरे सर तसेच केंद्र शाळेचे मुख्याध्यापक विनोद करपे सर यांनी निपक्षपाती पार पाडले. संपूर्ण कार्यक्रमाचे व स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन जिल्हा परिषद शाळा कोचाळे शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे सर व शाळेतील सर्व शिक्षकांनी तसेच पालक व ग्रामस्थांनी केले होते विजेते स्पर्धक आता शैक्षणिक तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होतील.
Tags
जिल्हा पालघर