वाडा नगराध्यक्ष पदी भाजपच्या रिमा गंधे प्रचंड मताने विजयी
पालघर जिल्हा प्रतिनिधी :– (अमीन मेमन) :– वाडा नगरपंचायतीच्या आज झालेल्या मतमोजणीत भाजपाने नगराध्यक्ष पदासह १२ जागांवर विजय मिळवत बाड़ा नगरपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापन करून आपला झेंडा फडकवून कमळ फुलवले. रिमा गंधे यांनी ३ हजार ९६७
मते मिळवून सुमारे ९७२ मतांनी विजयी झाल्या आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने तीन, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक काँग्रेस एक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एक अशा जागांवर विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना उचाठा पक्षाचा धुव्वा उडवला
असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला आपले खातेही खोलता आले नाही त्यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
रिमा गंधे यांना ३ हजार ९६७ मते मिळाली त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवार हेमांगी पाटील यांना २ हजार ९९५ तर
उबाठा गटाच्या निकिता गंधे यांना २ हजार ४८७ मते मिळवून रिमा गंधे या ९७२ मतांनी विजयी झाल्या आहेत. रिमा यांचा विजय होताच भाजपच्या कार्यकत्यांनी एकच जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला. प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या स्मिता पातकर यांनी ४०७ मते मिळवून उबाठा गटाच्या प्रिती गंधे यांचा पराभव केला, प्रभाग क्रमांक ४ भाजपचे अशिकेश पवार हे विजयी झाले असून त्यांना २७९ मते मिळवली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार राजेश पालकर पराभूत झाले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे तेजस पाटील ३६५ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे राजकिरण पाटील यांचा पराभव केला आहे.
Tags
जिल्हा पालघर