तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :– दि.२७\१२\२०२५ मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद पालघर यांच्या पुढाकारातून तालुका वाडा येथील खडकोना ग्रामपंचायत हद्दीत आज सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी करण्यात आली.
या उपक्रमात जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद खातेप्रमुख व कर्मचारी, गट विकास अधिकारी पालघर व इतर कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासन खडकोना, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शिक्षक व विद्यार्थी, महिला बचत गटाच्या सदस्य, वनक्षेत्रपाल तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.
वनराई बंधाऱ्याच्या उभारणीमुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून परिसरातील शेतीसाठी जलसाठा उपलब्ध होणार आहे. तसेच मृद्धूप रोखण्यास आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासही या उपक्रमाचा लाभ होणार आहे. शासनाच्या जलसंधारण धोरणाला स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष कृतीतून बळकटी देण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांकडून नमूद करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिक यांचा समन्वय साधून गावपातळीवर विकासाभिमुख उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत असून खडकोना येथील वनराई बंधारा त्या उद्देशाने बंधारा आहे. भविष्यातही अशा लोकसहभागातून जलसंधारण व ग्रामीण विकासाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी यावेळी सांगितले.
Tags
जिल्हा पालघर