तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :– उधवा प्रीमियर लीग आयोजित उधवा महोत्सव दिनांक २५/१२/२०२४ रोजी उद्घाटन सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डहाणू मतदार संघाचे विद्यमान आमदार विनोद भिवा निकोले साहेब यांनी हजेरी लावली. तसेच मुख्य अतिथी म्हणून मा. मोनू केशवाणी (Scientist and Strategic Partner – Clinic Diagnostics), मलिक केशवाणी (MD Josh Beverstech LMT.), नंदकुमार वनस्या हाडळ (माजी सभापती पं. समिती तलासरी), सौ. कों. निर्मला देवराम फरले (सरपंच उद्यवा ग्रा. पं.), डॉ. भरत कुमार सर (अध्यक्ष डॉक्टर्स असोसिएशन) आणि व्यापारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमादरम्यान क्रीडा क्षेत्रात मॅरेथॉन, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, खो-खो यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्राकरिता निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि नृत्य स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.
त्याच प्रमाणे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. दरम्यान इस्माईल खाटीक, अमीर अली दाऊदाणी, केतन परमार व दयानंद शिंदे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर राबवले असून एकूण ४३ खेळाडू रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर आयोजनादरम्यान चॅम्पियन ट्रॉफी (क्रिकेट) एक ग्रामपंचायत एक संघ या संकल्पनेतून उद्यवा, कुझे, उपलाट, तलासरी, सायवन, निंबापूर-बांधघर, वडवली-सवणे, आष्टा-रायपूर-बांधघर, एकूण ०८ ग्राम पंचायत संघांचा सहभाग करण्यात आलेला आहे. चॅम्पियन ट्रॉफी करिता डहाणू-तलासरी कला क्रीडा मंडळ यांनी विशेष सहकार्य केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कॉम्रेड अक्षय प्रविण दवणेकर (माजी जि. प. सदस्य), सचिव मा.कल्पेश माहाला, मा. विनोद कुरकुटे, खजिनदार मा. को. अरुण कानल (सदस्य उद्यवा ग्रा. पं.), मा. श्री. संजय बारह्या, कार्याध्यक्ष मा. श्री. योगेश नाठे, मा. श्री. राकेश माच्छी, मा. श्री. अजय गिरी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले.
Tags
जिल्हा पालघर