मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वेढी येथे* *श्वान निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण केंद्राचे उद्घाटन

 *तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :–* मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत वेढी येथे जिल्हा परिषद पालघर, पशुसंवर्धन विभाग व जेनिस स्मिथ अ‍ॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्वान निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे आणि जिल्हा पशू संवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र सुरू करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत वेढी येथील नचिकेत पाटील, अभिजीत पाटील आणि छोडू बगूल,
ग्रामपंचायत सफाळे,
ग्रामपंचायत नगावे 
ग्रामपंचायत विराथन खुर्द,
ग्रामपंचायत माकुणसार येथील सरपंच,
तसेच जोनिस स्मिथ अ‍ॅनिमल वेल्फेअर ट्रस्टचे तज्ज्ञ डॉक्टर, जिल्हा परिषद पालघर येथील डॉ. राहुल संखे (पशुधन विकास अधिकारी, पं. स. पालघर) आणि डॉ. श्रद्धा मांढरे(पशुवैद्यकीय अधिकारी, आगरवाडी) उपस्थित होते.
या केंद्रामार्फत सदर ग्रामपंचायत तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावांमधील भटक्या श्वानांचे संकलन, निर्बीजीकरण (नसबंदी), रेबीज लसीकरण तसेच शस्त्रक्रियेनंतरची निगा ही प्रक्रिया प्रशिक्षित तज्ज्ञांकडून राबविण्यात येत आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर श्वानांना त्यांच्या मूळ परिसरात सुरक्षितरीत्या सोडण्यात येणार आहे.

“भटक्या श्वानांची अनियंत्रित वाढ, नागरिकांचा वाढता त्रास आणि रेबीजचा धोका लक्षात घेता श्वान निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण केंद्रे अत्यंत आवश्यक आहेत. केंद्र-आधारित पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे जिल्हाभर भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात येऊन नागरिकांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल.” असे प्रतिपादन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे  यांनी केले.

 अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी  सांगितले की,
“वैज्ञानिक पद्धतीने राबविण्यात येणारी श्वान निर्बीजीकरण प्रक्रिया दीर्घकालीन उपाययोजना ठरणार आहे. श्वानांची योग्य काळजी, उपचार, रेबीज लसीकरण आणि सुरक्षित पुनर्वसन या संपूर्ण प्रक्रियेचा थेट लाभ नागरिकांच्या सुरक्षिततेस होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post