सोलापूर | प्रतिनिधी : आम् संघर्ष टाईम्स online प्रभाग क्रमांक ०५ मधून शिवम सोनकांबळे यांची उमेदवारी जाहीर
R.P.I. (आठवले) कडून “बदल हवा… चेहरा नवा…” चा नारा
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०५ मधून शिवम सोनकांबळे (M.E. – Master of Engineering) यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कडून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. समाजसेवेला केवळ भूमिका न मानता ओळख म्हणून स्वीकारलेल्या शिवम सोनकांबळे यांनी सर्वांगीण विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला आहे.
महिला सशक्तीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, स्वच्छ व सुरक्षित परिसर, सुरळीत पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, आरोग्य व शिक्षण सुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस, पारदर्शक आणि वेळबद्ध काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकून तत्काळ उपाययोजना करणे ही आपली प्राथमिकता राहील, असेही त्यांनी सांगितले.
“विकास म्हणजे फक्त योजना नव्हे, तर प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील सकारात्मक बदल,” या विश्वासावर काम करत प्रभाग क्रमांक ०५ ला आदर्श प्रभाग बनवण्याचा संकल्प शिवम सोनकांबळे यांनी केला आहे.
या जनसेवेच्या प्रवासात नागरिकांचा पाठिंबा, विश्वास आणि सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे आवाहनही त्यांनी केले.
Tags
जिल्हा सोलापूर