श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र महोत्सव २०२६ निमित्ताने तुळजापूर शहरात भव्य आणि नेत्रदीपक ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष कार्यक्रम शुक्रवार, ०२ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० या वेळेत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर येथे संपन्न होणार आहे.
या भव्य ड्रोन शोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आकाशात विविध आकर्षक आकृत्या, प्रकाशरचना व सांस्कृतिक प्रतीकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. देवी श्री तुळजाभवानीच्या महात्म्याचे दर्शन घडवणारे तसेच भक्ती, संस्कृती व आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम दर्शवणारे हे विशेष तांत्रिक सादरीकरण नागरिकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे.
शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे तुळजापूर शहरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या भव्य ड्रोन शोचा लाभ घेण्यासाठी भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
धाराशिव जिल्हा