नळदुर्ग (प्रतिनिधी) श्रीकांत कुलकर्णी : आयोध्या नगर, नळदुर्ग येथील वत्सला गॅस एजन्सीमध्ये गॅस वितरणाबाबत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. सध्या देशात युद्धजन्य परिस्थिती असली तरी गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र तरीही संबंधित एजन्सीकडून ग्राहकांना जाचक अटी लावून गॅस सिलिंडर देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
ग्राहकांचे केवायसी पूर्ण झालेले असताना तसेच ऑनलाईन रक्कम भरूनही तीन दिवस उलटून गेले तरी गॅस सिलिंडर दिला जात नसल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एजन्सीकडून जाणूनबुजून विलंब करून गॅस सिलिंडर ब्लॅकमध्ये विक्री करण्याचा प्रकार सुरू असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांत मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, सदर एजन्सीची सखोल चौकशी करून काही गैरप्रकार सुरू आहेत का याचा पडदा फाश करावा, अशी मागणी नागरिकांनी माननीय जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
Tags
जिल्हा धाराशिव