कळंब :- (सिकंदर पठाण) :- धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे 29 मार्च रोजी कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम अतिशय चैतन्यमयी वातावरण संपन्न झाला. तेर शहरासह परिसरातील हजारो लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला.
सविस्तर माहिती अशी की, तेर येथे परमपूज्य श्री माताजींच्या परमकृपेत कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसांपासून राज्यभरातून आलेल्या सहजयोगींनी कळंब शहरात जाऊन या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली होती. तसेच कळंब शहरातील विविध राजकीय पुढारी तसेच दुकानदार,रहिवाशी यांची भेट घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. त्याचबरोबर घरोघरी जाऊन या कार्यक्रमाचे महत्व सांगून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या सहजयोगींनी तीन दिवस मुक्कामी राहून परिसरातील लोकांपर्यंत सहजयोगा बाबत जनजागृती करण्याचे उत्तम कार्य केले. रविवारी रोजी सायंकाळी सहज संगीताच्या कार्यक्रम पार पडला. रविवार दि.29 रोजी सायंकाळच्या सुमारास शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मैदानात कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित सहजयोगींनी हजारो लोकांना सहजयोगाच्या बाबतीत सविस्तर माहिती सांगितली. परमपूज्य श्रीमाताजी श्री निर्मलादेवी प्रणित सहजयोग ही एक आत्मज्ञानाची सोपी पद्धत आहे. प्रत्येक मानवाच्या माकडहाडांमध्ये ही कुंडलिनी शक्ती सुप्त अवस्थेत व साडेतीन वेटोळे घालून बसलेली असते, सहजयोगाद्वारे ती जागृत होऊन साधकांचा सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीबरोबर योग (मिलन/जोडले जाणे) घटित होतो त्याला आत्मसाक्षात्कार मिळतो, यामुळे साधकाला स्वतःच्या टाळूवर किंवा तळहातावर थंड चैतन्य लहरींची जाणीव होते, व निर्वीचार अवस्था प्राप्त होते. नियमित ध्यानाद्वारे हा योग घटित झाल्यावर साधू संतांनी वर्णन केल्याप्रमाणे परमशांतीची अनुभुती साधकाला मिळते व असा साधक दुसर्याला सुद्धा अनुभूती देऊ शकतो. पुर्वीच्या काळी अनेक ऋषीमुनी आत्मज्ञानासाठी आणि परम्सत्य जाणून घेण्यासाठी कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करीत, त्यासाठी त्यांना खुप तप प्रयास करावे लागते. पण आता श्रीमाताजी निर्मलादेवींच्या कृपाशिर्वादामुळे आत्मसाक्षात्काराचे हे पवित्र ज्ञान मानव जातीसाठी सुलभ झालेले आहे अशा प्रकारची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
कळंब शहर व परिसरातील आलेल्या हजारो लोकांनी या चैतन्यमयी कार्यक्रमाचा लाभ घेतला.राज्यातील सहजयोगींनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल कळंब लोकांनी सर्व सहजयोगींचे तसेच सहजयोगींनी उपस्थित लोकांचे कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढविली त्याबद्दल आभार मानले.
Tags
जिल्हा धाराशिव