मतमोजणीच्या दिवसी मद्य विक्री बंद*

पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– दि. १७ :  राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडून नगरपरिषद/ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्याअनुषंगाने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्हयातील पालघर, डहाणू, जव्हार या नगर परिषदा तसेच वाडा नगरपंचायतीच्या निवडणूकीकरिता मंगळवार, दिनांक ०२.१२.२०२५ रोजी मतदान पार पडलेले असून राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार रविवार दिनांक २१.१२.२०२५ रोजी मतमोजणी होणार आहे.

तसेच सदर निवडणूक ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरीता सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यातील वरील नमूद नगर परिषदा व नगरपंचायत क्षेत्रातील अबकारी अनुज्ञप्त्या  महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ व त्यांतर्गत निर्मित विविध नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये तसेच मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे दिनांक ०४.११.२०२५ व दिनांक ०२.१२.२०२५ रोजीच्या आदेशातील निर्देशानुसार पालघर जिल्हयातील पालघर, जव्हार आणि डहाणू नगरपरिषदा तसेच वाडा नगरपंचायत क्षेत्रातील सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या खालील प्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी जारी केले आहेत.

मतमोजणीचा दिवस दिनांक २१.१२.२०२५ दिवशी मतमोजणी प्रकीया संपेपर्यंत पालघर जिल्हयातील पालघर नगर परषिद, डहाणू नगरपरिषद, जव्हार नगरपरिषद व  वाडा नगरपंचायत अशा एकूण ३ नगरपरिषदा व १ नगरपंचायतीच्या हद्दीत बंद राहील.
वरील नमूद केल्याप्रमाणे आदेशित करण्यात आलेल्या बंद कालावधीत नमूद केलेल्या ठिकाणी ज्या अनुज्ञप्तीमध्ये आदेशाचे उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येईल त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून सर्व संबंधीतांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post