पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– दिनांक २४ डिसेंबर : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालघर यांच्या पुढाकाराने तसेच वरद चारिटेबल ट्रस्ट, वरद हॉस्पिटल बोईसर, अदानी पावर लिमिटेड आणि इन्फ्रीगो आय केअर हॉस्पिटल, पालघर यांच्या संयुक्त सहकार्याने माटगाव, ता.डहाणू येथे दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण १२३ नागरिकांनी सहभाग घेतला, त्यापैकी २६ लाभार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, माटगाव येथील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
Tags
जिल्हा पालघर