धाराशिव (प्रतिनिधी) : आम संघर्ष टाईम्स online धाराशिव तालुक्यातील धारुर व बावी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष, टरबूज आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी फळांची गळती होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.पाहणीदरम्यान आमदार पाटील यांनी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. “एकाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये, नुकसानाचे अचूक मूल्यमापन करून शासनाकडून भरघोस मदत मिळवून देऊ,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हतबल झाले असून शासनाने त्वरित मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.अवकाळी पावसाचा फटका; आमदार कैलास पाटील यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणीअवकाळी पावसाचा फटका; आमदार कैलास पाटील यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणी
Tags
धाराशिव जिल्हा